Friday, 30 November 2012

"तो"

रोज ओफिस मधून बस ने घरी जाताना साधारण ९ वाजून गेलेले असतात. तेव्हा बसच्या खिडकीतून हलकेच तो दिसतो. असे वाटते कि तो आपल्याकडे बघून हसतो आहे. खूप वेळ त्याच्या कडे बघण्यात वेळ जातो. असे मानतात कि जे कोणाशी आपल्या मनातले बोलत नाहीत ते त्याच्याशी मनमोकळे पणे बोलतात. पण किती सुरक्षित आहे ना!! माणसांशी बोलले कि मनात भीती बाळगून राहायला लागते कि चुकून हे कुठे काही बोलले तर...पण त्याच्या बाबतीत मात्र तसे नाहीये. खरच त्याच्या सारखा सखा नाही... याचा अर्थ असा नाही कि मी कोणाशी बोलत नाही.. पण मला परवा फारच वाटत होते कि कोणाशी तरी जवळच्या माणसाशी बोलावे आणि त्यावेळी माझे जवळचे कोणी माझ्या बरोबर नव्हते. पण तेव्हा तो बरोबर होता. मी खूप बोलले त्याच्याशी.. अगदी मनमोकळेपणे.. खूप हलके हलके वाटले कोणीतरी आपले सक्खे जवळचे एकदम दूर गेल्यासारखे वाटणे हे खूप मनाला  त्रास देऊन  जातात... आपण एवढा जीव लावतो आणि ते एकदम दूर जातात. किती एकमेकांमध्ये आपण गुंतलेले असतो हे तेव्हा कळते. पण त्याचे तसे नाहीये. तो कायमच माझ्या जवळ असतो.. जेव्हा  मला गरज असते तो माझ्या समोर असतो. त्याचे समोर असणेच मुळी आल्हाददायक असते. एक दिलासा मिळतो. तो माझ्याशी प्रत्यक्ष काहीच बोलत नाही. पण असे वाटते कि तो खूप काही सांगून जातो आणि ती भाषा खूप सुंदर असते.... खूप जुनी मैत्री आहे आमची.
माझी तर मैत्री आहेच जुनी....पण तुमचे काय...तुम्ही भेटलात का त्याला... नाही......????? मग भेटा त्याला...खूप छान आहे तो...एकदम No tension friend आहे.... एकदा दोनदा तुम्हाला वाटेल कि कसे बोलावे त्याच्याशी पण एकदा मैत्री झाली कि मग तुमचे पण हेच म्हणणे होईल...कि "चंद्रासारखा मित्र नाही...."
बोलून तर बघा!!!!

No comments:

Post a Comment