आज सकाळी एक sms आला माझ्या एका ओळखीच्या माणसाचा. ते खरे म्हणजे माझे trainer आहेत. पण सध्या रोजच्या sms मुळे ते आता माझे मित्र झाले आहेत. त्यानी आजही नेहमीसारखा sms केला. मला आवडला म्हणून मी त्याना फोन केला तर ते busy होते म्हणून मी त्याना mail केली. विशेष काही लिहिले नाही पण मला त्यांचा sms आवडला हेच लिहिले होते. त्याना काय वाटले कोण जाणे पण त्याना माझी mail इतकी आवडली की त्यांच्या डोळ्यात पाणी आले. खरच त्याना त्या mail काय दिसले माहीत नाही.
पण या वरुन असे कळते की आपण एखाद्याच्या आयुष्यात किती महत्वाचे असतो. जेव्हा आपण कोणाला तरी महत्व देतो तेव्हा समोरचा आपल्याला महत्व देईलच असे नाही आणि मग तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. हे मी अनुभवले आहे...आणि म्हणूनच मी ठरवले की इथुन पुढे जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या आयुषात येईल आणि तिला जर आपल्यामुळे आनंद मिळणार असेल तर आपण त्या व्यक्तीला कायम आनंदच द्यायचा. जेणेकरून आपण आणि ती व्यक्ती पण आनंदी होईल. आणि आज त्याचा प्रत्यय मला आला.
खरच मी विचार करायला लागले की आपण इतके महत्वाचे आहोत कोणासाठी तरी की आपल्याला समजत पण नाही... आणि नकळत आपले त्याच लोकांकडे दुर्लक्ष होते. आणि हे कधी कळते जेव्हा आपल्याकडे कोणी दुर्लक्ष करते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि आपली खूप चीडचीड होते.
तत्पर्य काय की आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा महत्वाचा असतो. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण शेवटी जगाची एक रीत आहे की "जशास तसे"