Friday 14 December 2012

शोध स्वभावाचा!!!

खूप दिवसांपासून मनात एक गोष्ट राहून जाते आहे. कोणाशी बोलावे तेच कळत नाही. पण आज मात्र असे वाटले कि आपण कुठेतरी हे share करावे. माझ्या दिसण्यात अशी काही लोक आहेत जी अशी काही विचित्र वागतात कि त्यांच्याशी कोणी नाते जपतील तर नवलच!!!!
एखाद्याने कोणाच्या तरी मनाशी खेळ करणे हि खूप वाईट गोष्ट आहे. त्याचा त्या माणसाला खूप त्रास होतो. आता मनाशी खेळ म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? सांगते... असे कि एकाद्याने खूप समजावून सांगून सुद्धा समोरचा माणूस स्वतःच्याच मनासारखे वागत राहिला तर समोरची व्यक्ती काही दिवसाने सांगणे सोडून देईन. 
किंवा असे कि हे चूक आहे असे एकाद्याला जीव तोडून सांगणे आणि तरी सुद्धा समोरचा चुकीचाच वागत राहिला तर किती चिडचिड होईल हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको. किंवा असे कि एखादा माणूस चुकला आणि ती चूक जर माफ करून सुधारण्याची संधी दिली आणि पुन्हा पुन्हा जर तीच चूक झाली तर याचा अर्थ असा होऊ शकतो कि त्या माणसाला त्या चुकीचा कोणताही पश्चाताप झालेला नाही. आणि आपण मात्र प्रत्येक वेळेस समजून घेऊन, समजावून सांगतो आणि ती व्यक्ती आपल्या आपल्या मनाने वागायला मोकळी असते.
मला तर असे वाटते कि खरे तर असे काही न ठरवता सुद्धा त्या व्यक्ती कडून  काही लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. आणि मुख्य म्हणजे ती माणसे त्या व्यक्तीच्या सगळ्यात जवळची असतात. आणि मग हळूहळू त्या व्यक्तीचा स्वभावच असा बनतो कि त्याला  सहानुभूती मिळाली कि ती व्यक्ती त्या माणसाला खूप त्रास देते. आणि मग इतका त्रास सहनशक्ती च्या पलीकडे जातो कि ती व्यक्ती त्या व्यक्तीपासून दूर जाते.
असे का होते ह्याचा मी खूप विचार करते पण मला अजून त्याचे उत्तर मिळाले नाही. का वागत असेल ती व्यक्ती अशी भरकटल्या सारखी ??? ती व्यक्ती काय मिळवत असेल असा त्रास देऊन आणि तो पण आपल्या सगळ्यात जवळच्या माणसाना??
आपण एखाद्या माणसात किती अडकावे हे आपले आपणच ठरवावे आणि ते सुद्धा वेळेत. कारण उशीर झाला तर मग त्याचा त्रास हि होऊ शकतो. एकदा तुमची attachment वाढली कि मग तुम्हाला त्यातून काढता पाय घेणे जमले पाहिजे......जे मला स्वतःला अजिबात जमत नाही. त्यामुळे मला वर मांडलेल्या सगळ्या गोष्टींचा त्रास झालेला आहे. म्हणजे कसे आहे ना कि जर तुम्ही पटकन switch off आणि on होणे जमत असेल तर छान नाहीतर त्याचा त्रास जास्त होतो. काही माणसे मी अशी पहिली आहेत जी या गोष्टींचा फार विचार करतच नाहीत. ते म्हणतात "कोणाला वेळ आहे या अश्या गोष्टींचा विचार करायला" "या कानाने ऐका आणि त्या कानाने सोडून द्या" हाच जगाचा नियम आहे. मला हि लोक म्हणतात कि तू खूप emotional आहे. उगीच कशात तरी अडकते.
पण आता मला याची उत्तरे शोधायची आहेत. तुम्ही साथ देणार?

Friday 30 November 2012

"तो"

रोज ओफिस मधून बस ने घरी जाताना साधारण ९ वाजून गेलेले असतात. तेव्हा बसच्या खिडकीतून हलकेच तो दिसतो. असे वाटते कि तो आपल्याकडे बघून हसतो आहे. खूप वेळ त्याच्या कडे बघण्यात वेळ जातो. असे मानतात कि जे कोणाशी आपल्या मनातले बोलत नाहीत ते त्याच्याशी मनमोकळे पणे बोलतात. पण किती सुरक्षित आहे ना!! माणसांशी बोलले कि मनात भीती बाळगून राहायला लागते कि चुकून हे कुठे काही बोलले तर...पण त्याच्या बाबतीत मात्र तसे नाहीये. खरच त्याच्या सारखा सखा नाही... याचा अर्थ असा नाही कि मी कोणाशी बोलत नाही.. पण मला परवा फारच वाटत होते कि कोणाशी तरी जवळच्या माणसाशी बोलावे आणि त्यावेळी माझे जवळचे कोणी माझ्या बरोबर नव्हते. पण तेव्हा तो बरोबर होता. मी खूप बोलले त्याच्याशी.. अगदी मनमोकळेपणे.. खूप हलके हलके वाटले कोणीतरी आपले सक्खे जवळचे एकदम दूर गेल्यासारखे वाटणे हे खूप मनाला  त्रास देऊन  जातात... आपण एवढा जीव लावतो आणि ते एकदम दूर जातात. किती एकमेकांमध्ये आपण गुंतलेले असतो हे तेव्हा कळते. पण त्याचे तसे नाहीये. तो कायमच माझ्या जवळ असतो.. जेव्हा  मला गरज असते तो माझ्या समोर असतो. त्याचे समोर असणेच मुळी आल्हाददायक असते. एक दिलासा मिळतो. तो माझ्याशी प्रत्यक्ष काहीच बोलत नाही. पण असे वाटते कि तो खूप काही सांगून जातो आणि ती भाषा खूप सुंदर असते.... खूप जुनी मैत्री आहे आमची.
माझी तर मैत्री आहेच जुनी....पण तुमचे काय...तुम्ही भेटलात का त्याला... नाही......????? मग भेटा त्याला...खूप छान आहे तो...एकदम No tension friend आहे.... एकदा दोनदा तुम्हाला वाटेल कि कसे बोलावे त्याच्याशी पण एकदा मैत्री झाली कि मग तुमचे पण हेच म्हणणे होईल...कि "चंद्रासारखा मित्र नाही...."
बोलून तर बघा!!!!

Tuesday 30 October 2012

जशास तसे



आज सकाळी एक sms आला माझ्या एका ओळखीच्या माणसाचा. ते खरे म्हणजे माझे trainer आहेत. पण सध्या रोजच्या sms मुळे ते आता माझे मित्र झाले आहेत. त्यानी आजही नेहमीसारखा sms केला. मला आवडला म्हणून मी त्याना फोन केला तर ते busy होते म्हणून मी त्याना mail केली. विशेष काही लिहिले नाही पण मला त्यांचा sms आवडला हेच लिहिले होते. त्याना काय वाटले कोण जाणे पण त्याना माझी mail इतकी आवडली की त्यांच्या डोळ्यात पाणी आले. खरच त्याना त्या mail काय दिसले माहीत नाही.

पण या वरुन असे कळते की आपण एखाद्याच्या आयुष्यात किती महत्वाचे असतो. जेव्हा आपण कोणाला तरी महत्व देतो तेव्हा समोरचा आपल्याला महत्व देईलच असे नाही आणि मग तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो. हे मी अनुभवले आहे...आणि म्हणूनच मी  ठरवले की इथुन पुढे जेव्हा कोणी व्यक्ती आपल्या आयुषात येईल आणि तिला जर आपल्यामुळे आनंद मिळणार असेल तर आपण त्या व्यक्तीला कायम आनंदच द्यायचा. जेणेकरून आपण आणि ती व्यक्ती पण आनंदी होईल. आणि आज त्याचा प्रत्यय मला आला.

खरच मी विचार करायला लागले की आपण इतके महत्वाचे आहोत कोणासाठी तरी की आपल्याला समजत पण नाही... आणि नकळत आपले त्याच लोकांकडे दुर्लक्ष होते. आणि हे कधी कळते  जेव्हा आपल्याकडे कोणी दुर्लक्ष करते तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो आणि आपली खूप चीडचीड होते.

तत्पर्य काय की आयुष्यात येणारा प्रत्येक माणूस हा महत्वाचा असतो. आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण शेवटी जगाची एक रीत आहे की "जशास तसे"

Monday 3 September 2012

आठवणीतली दिवाळी पहाट





आज सकाळी मी ऑफिस ला यायला कॅब मध्ये बसले आणि radio वर असच कोणतेतरी गाणे लागले होते..ते ऐकून मला एकदम एका दिवाळी पहाट ची आठवण आली. ७-८ वर्षानापुर्वीची दिवाळी पहाट. मी आणि माझी आजी एका दिवाळी पहाट च्या कार्यक्रमाला गेलो होतो. खूप छान कार्यक्रम चालू होता. एक सुंदर गाणे माझ्या कानावर आले आणि मी कुठेतरी हरवून गेले. आणि त्यात एक sms आला .. "खूप दिवसापासून काहीतरी पेंडिंग होते ते मला आज मिळाले...तुला एक छानसे surprise दिवाळीनिमित्त. Guess who " मला काही कळेच ना कि हे कोण आहे आणि असा sms मला का केला असेल. तोपर्यंत इकडे ते छानसे गाणे पण संपले होते आणि टाळ्यांचा आवाज चालू होता. आजी एकदम म्हणाली "छान म्हटले ना गाणे " मी नुसतीच मान डोलावली आणि पुन्हा त्या sms चा  विचार करायला लागले...मग शेवटी ठरवले कि आता phone च करायचा. आणि तडक phone लावला. मी hello म्हणण्या आधी तिकडून कोणीतरी बोलले.."शुभ दिवाळी कसे वाटले surprise ? पहिला sms तुलाच केला अगदी ठरल्याप्रमाणे. तू म्हणाली होती ना कि जेव्हा तू पहिला mobile घेशील तेव्हा पहिला sms मला कर; मी लगेच ओळखेन कि हा तुझा नवीन mobile आहे " आणि मग तो आवाज ऐकून इतका बरे वाटले आणि खूप मनापासून आनंद झाला. खरच ती दिवाळी पहाट माझ्या कायम आठवणीतली ठरली..
खरच आपल्या आयुष्यात कोण कधी कसे येईल याचा थांगपत्ताच लागत नाही..आणि एक दिवस अचानक ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि आपले आयुष्य पालटून टाकते. 

Blog म्हणजे काय?


आज काळ सगळे उठून Blog लिहायला लागले आहेत. हा Blog म्हणजे नक्की आहे तरी काय? माझी अशी समजूत आहे कि blog म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आपल्या मनात चाललेले आणि दुसर्यांना उघडपणे न सांगता येणारे सगळे काही आपण यात लिहू शकतो..कारण त्यात कोणी नावांचा वापर करत नाही. पण तरी सगळे लिहिले जाते. मग तो Blog  कधी एखाद्या माणसावर असतो तर कधी एखाद्या प्रसंगावर, तर कधी एखाद्या प्राण्यावर तर कधी खाण्यावर तर कधी general म्हणजे एखादा घरातला, ओफिसिमाध्ला विषयावर...
मग मीही ठरवले कि बघू आपल्याला एखादा Blog लिहिता येतो का? पण मग प्रश्न पडला कि काय लिहू blog मध्ये. माझ्यापुढे तर असा काही विषय येत नाही ज्यावर मी काही लिहू शकेन..